सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरची पूजा गडदे खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम.

सांगोला (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यातर्फे दिनांक १७सप्टेंबर २०२३ रोजी भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील
पूजा आप्पासो गडदे इयत्ता अकरावी कला अ हिने 3 कि.मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला व रोख रक्कम तीन हजार रुपयाचे बक्षीस मिळविले. तसेच मुक्ता संजय होवळ इयत्ता बारावी शास्त्र ब हिने ३ कि.मी.धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला व रोख रक्कम दोन हजार रुपयाचे बक्षीस मिळविले..

 

या यशस्वी खेळाडूंना  क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील, नरेंद्र होनराव सुभाष निंबाळकर , प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सचिव मल्लिकार्जुन घोंगडे ,खजिनदार शंकरराव सावंत ,सहसचिव प्रशूद्धचंद्र झपके , संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार (क्रीडा नियंत्रक),बिभीषन माने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!