जवळा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री.गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना.

जवळे (प्रशांत चव्हाण) कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा या प्रशालेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात श्री.गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रारंभी प्रशालेतील विद्यार्थिनीच्या ग्रुपने गावातील मेन चौक, सम्राट चौक, कोष्टी गल्ली, जुनी चावडी व मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढत हे विघ्नहर्ता बाप्पा विघ्नहर्ता, गणनायका गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, आया देखो आया बाप्पा मोरया,मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, देवा तुझ्या दारी आलो. या श्री गणेशाच्या गीतावर अप्रतिम नृत्य केले. तसेच विद्यार्थिनींच्या लेझीम ग्रुपने देखील अप्रतिम असे लेझीम नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा देत श्री गणेशाची मूर्ती प्रशालेत आणली यावेळी जवळा गावातील वातावरण भक्तीमध्ये झाले होते.

या मिरवणुकीत जुनी चावडी येथे प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. सुभाष दिघे सर यांच्या हस्ते तर प्रशालेत प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर व सौ.अर्चना शिंदे मॅडम यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून चिरमुरे,शेंगदाणे,डाळे मिक्स असणारा प्रसाद दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.