सांगोला तालुकाशैक्षणिक
प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकासह विविध अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे- दीपकआबा साळुंखे- पाटील

सांगोला, ता. १९ : प्राथमिक शिक्षण हा समाज विकासाचा कणा आहे.त्यामुळे प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना केवळ शिक्षणाचेच काम हवे आहे.शिवाय प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकासह विविध अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता टिकविण्यासाठी या विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत असे विचार विधान परिषदेचे माजी आमदार व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार,उपक्रमशील शाळा पुरस्कार,गुणवंत विद्यार्थी पुरस्कार नुकतेच माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये श्री.साळुंखे- पाटील बोलत होते.या कार्यक्रमास राज्य संघाचे कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे,राज्य शिक्षक संघाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लहू कांबळे,जिल्हा संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार,संजय चेळेकर, रणजीत थिटे,विनायक शिंदे, सूर्यकांत डोगे,दिलीप ताटे,अशोक पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील पुढे म्हणाले की,सध्या ग्रामीण भागात सर्वत्र खाजगी शिक्षण व्यवस्था झपाट्याने वाढते आहे.यामुळे ग्रामीण व सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे.हे अतिक्रमण रोखण्यासाठी सामुदायिक कामाची गरज आहे.शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन यावर विचार करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.राज्य संघाचे कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे बोलताना म्हणाले की, सांगोला येथील दीपक आबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्था केवळ पतपुरवठा करणे व वसूल करणे एवढेच काम करत नाही तर आपल्यातील गुणीजनांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत आहे.यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळून ते अधिक जोमाने काम करत आहेत.या संस्थेचे कामकाज सर्वांनी आदर्श घेण्यासारखेच आहे.
पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबाजी क्षीरसागर व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सदाशिव गेनू साबळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेमध्ये विश्वंभर लवटे यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.तर शंकर माने,बजरंग तंडे, साऊबा वाले, मोहन केदार, साहेबराव शिंदे,मारुती काळेबाग,संजय बुरांडे,सीमादेवी गव्हाणे, बाळासाहेब चंदनशिवे,राजाराम बनसोडे,राणी वेळेकर,मुकुंद देशमुख,धनंजय महाजन,दिलीप ढेरे, लक्ष्मी परीट,बळी होवाळ,आनंदा जगताप,अर्जुन दिघे,विजय भोसले,साहिल खलिफा,प्रदीप कुलकर्णी,उत्तरेश्वर बनसोडे, सुरेश घाडगे, जयश्री शिंदे, नागनाथ राजमाने, सिद्धेश्वर जगदाळे, राजेंद्र ठोकळे,राजेश गडहिरे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच पतसंस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा शिष्यवृत्ती,नवोदय,दहावी, बारावी परीक्षेतील यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आला.
उपक्रमशील शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरे करांडेवस्ती (केंद्र कोळा),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथनगर(केंद्र चोपडी),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी(केंद्र महूद),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोटेवाडी(सोनलवाडी,केंद्र एखतपुर),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणिचिंचाळे(केंद्र वाकी घेरडी) या शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.संजय गायकवाड यांनी तयार केलेल्या सुट्ट्यांच्या यादीची पॉकेट डायरी माजी आमदार साळुंखे-पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
राज्याच्या उपाध्यक्षपदी सुहास कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी मोहन आवताडे
सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांची राज्य शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिक्षक संघाचे नेते संभाजीतात्या थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनीही निवड केली आहे.यावेळी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नवीन कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार यांनी जाहीर केली. शिक्षक संघाच्या तालुका अध्यक्षपदी मोहन अवताडे,सरचिटणीस म्हणून वसंत बंडगर, कार्याध्यक्ष पदी महादेव नागणे,कोषाध्यक्ष म्हणून निसार इनामदार,प्रवक्ते म्हणून नागेश हवेली, प्रसिद्धी प्रमुख म्हणून गणेश व्हनखंडे तर उपाध्यक्षपदी युवराज मागाडे,विनोद पाटील, सत्यवान यादव,विश्वजीत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी दीपकआबा साळुंखे-पाटील पतसंस्थेचे चेअरमन कुमार बनसोडे,व्हाईस चेअरमन वसंत बंडगर,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील,माजी संचालक केशवराव घोडके,शिक्षक नेते विकास साळुंखे,माजी चेअरमन तानाजी खबाले,विश्वंभर लवटे,संतोष निंबाळकर,रफिक मुलाणी,दीपकआबा साळुंखे- पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन तानाजी साळे, विलास डोंगरे,रफिक शेख,गोविंद भोसले,माणिक मराठे,महादेव नागणे,कमल खबाले, पल्लवी मेणकर,सचिव अमर कुलकर्णी,सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब इंगोले,संचालक संजय काशीद-पाटील,बाळासाहेब बनसोडे,विजय इंगवले,शिक्षक संघ महिला आघाडीच्या सुमन बगले,राजेश्वरी कोरे,अंजली बिराजदार,रोहिणी भागवत,सांगोला तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष भारत लवटे,तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षा नयना पाटील,माजी अध्यक्ष भागवत भाटेकर,शैलेश चांडोले,संजय पवार, माणिक मिसाळ,जिल्हा पतसंस्थेच्या संचालिका शितल चव्हाण यांचेसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.