सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मंगळवार पासून प्रारंभ
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सन २०२३-२४ मंगळवार दि.२६ डिसेंबर ते गुरुवार दि.२८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे अशी माहिती प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी दिली.
यामध्ये मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शिक्षक दिन आयोजित केला असून याच दिवशी दुपारी २ वाजता प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाटिका व ज्युनिअर कॉलेज विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थी अल्पोपहार व फिशपॉंडस् अर्थात शेलापागोटे हा कार्यक्रम होणार आहे. व सकाळी दहा वाजता फन फेअर, विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये फनफेअरचे उद्घाटन सांगोला आगार प्रमुख विकास पोपळे यांच्या शुभहस्ते व संस्था सचिव म.शं. घोंगडे यांचे उपस्थितीत होणार आहे.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दंतरोग तज्ञ डॉ. सुनील नारनवर यांच्या शुभहस्ते व संस्था सदस्य ॲड. विजयसिंह चव्हाण यांचे उपस्थितीत होणार आहे.
कला प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था सदस्या सौ.शीलाकाकी झपके यांच्या शुभहस्ते व संस्था खजिनदार शंकरराव सावंत यांचे उपस्थितीत होणार आहे तर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मधुमती पाटील यांच्या शुभहस्ते व संस्था सदस्य दिगंबर जगताप यांचे उपस्थितीत होणार आहे. व दुपारी २ वाजता प्रशाला विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.
तसेच दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. राजशेखर सोलापूरे हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके हे भूषविणार आहेत.
स्नेहसंमेलनानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिकांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने ,स्नेहसंमेलन प्रमुख प्रशाला नरेंद्र होनराव, स्नेहसंमेलन प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.धनाजी चव्हाण,विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक यशराज अशोक पवार, प्राचार्य श्रीशैल्य ज्ञानेश्वर तेली, स्नेहसंमेलन जनरल सेक्रेटरी वैष्णव सचिन वसमळे, अथर्व चंद्रशेखर स्वामी, विद्यार्थीनी प्रतिनिधी साक्षी संभाजी देवकते,भारती रामचंद्र बनकर यांनी केले आहे.