मेडशिंगी गावचे सुपुत्र श्री.पांडुरंग शिंदे यांची राज्य सरकारच्यावतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावचे सुपुत्र श्री.पांडुरंग चांगदेव शिंदे यांची राज्य सरकारच्यावतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावचे रहिवाशी असलेले व कामानिमित्त मुंबई येथे असलेले एक संयमी, प्रामाणिकपणे मंत्रालयीन कामामध्ये व इतर शासकीय विभागामध्ये लोकांच्या मदतीला येणारे म्हणून त्याची ख्याती आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची भ्रष्टाचार निर्मुलन समिती, सदस्य, मुंबई जिल्हा उपनगरे येथे नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.