महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिकांची कोकण सहल संपन्न…

श्रावण महिना,पावसाळी सुखद हवा,पवित्र वातावरण….अशा वेळी  तिर्थाटन करावे,पर्यटन करावे असे वाटणे हा स्वभावधर्म आहे…त्यातल्या त्यात जवळ असणारे व निसर्गरम्य ठिकाण मिळाले तर कोणास नको आहे…सांगोलयतील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून सेवानिवृत्त झालेल्या व बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनेक व्हाट्स अप ग्रुप आहेत..या सर्व ग्रुपशी संबंधित असणारे प्रा.राजेंद्र ठोंबरे हे प्रत्येक ग्रुपचे व त्यातील ज्येष्ठ नागरिकांचे वेगवेगळे कार्यक्रम नेहमी घेत असतात…त्यांच्या स्वतःच्या एस.एस.सी.75 दहावी पहिली बैच मित्रमंडळीचा एक व्हाट्स अप ग्रुप असुन यातील ज्येष्ठ सद्स्य उत्साही व सक्रिय आहेत..या ग्रुपने दर दोन वर्षातून एक या प्रमाणे गेल्या पाच वर्षात आजपर्यंत एकूण तीन मित्र समेलने यशस्वी करुन दाखवली आहेत…या ग्रुप मधील सद्स्य नंदूकाका ठोंबरे हे एक असेच दानशूर व्यक्तिमत्व…अध्यात्म जोपासणारे,ध्यानमंदिर व नामसाधना मंडळाचे साधक असणारे नंदूकाका मैत्री ठेवणारे व मित्रात रमणारे ज्येष्ठ नागरिक आहेत…26 जानेवारी 2025 रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत झालेल्या तिसर्या मित्रसमेलनात त्यानी वर्गातील मित्रमैत्रिणीसाठी स्वखर्चाने एकदिवशीय सहल देण्याचे ठरवले होते..मात्र अंशत अंधत्व असल्याने त्यानी या सहलीची जबाबदारी बंधूमित्र प्रा.राजेंद्र ठोंबरे व इतर मित्रावर सोपवली होती..

 

.नंदूकाकाची इच्चपूर्ती करण्या साठी राजेन्द्र ठोंबरे यानी वर्गमित्र दिपक चौथे व अमर गुळमिरे यांच्या मदतिने एक मुक्कामी कोकण दर्शन सहलीचे नियोजन केले…त्या मध्ये मार्लेश्वर,गणपती पुळे,पावस व नानीज या पवित्र तीर्थक्षेत्री भेट देण्याचे नियोजन केले..सांगोला एस.टी.महामंडळ यांच्या सौजन्याने दिनांक 16 व 17 औगस्ट रोजी नविन करकरीत लालपरी गाडीने सदर सहल आनंदी व उत्साही वातावरणात पार पड्ली..या सहलीत 21 महिला व 19 पुरुष असे एकूण 40 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते…त्यात या बैचला अध्यापन करणारे दोन शिक्षक प्रा.उत्तमराव घाटुळे व सुधीर उकळे सहभागी झाले होते…मारळ गावचा मार्लेश्वर…तिथले सौंदर्य  निसर्ग,धबधबे,झाडी पाहुन व मार्लेश्वर दर्शनाने ज्येष्ठ नागरिक कृतार्थ झाले.. गणपती पुळे येथील दर्शन,समुद्राचे विशाल रुप,भाविक भक्तांची गर्दी व सततचा पाऊस यामुळे सद्स्य उत्साही झाले होते…

 

समुद्रस्नान व दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती..सतत पडणारया पावसाचा आनंद घेत नरेंद्र स्वामी यांच्या नानिज येथील मठाला भर पावसात भेट दिल्यानंतर सहल सांगोला मुक्कामी परतली…एस.टी.अधिकारी पोफळे साहेब यांच्या सहकार्याने व चालक रसुल मुलाणी यांच्या सहजसुंदर ड्रायव्हिन्गमुळे सदर कोकण सहल सुखकारकरित्या संपन्न झाली..त्या प्रित्यर्थ नंदुकाका ठोंबरे  व सौ.रजनी ठोंबरे यांचा अरुण पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला..त्याचप्रमाणे बसचालक रसुल मुलाणी यांचा दिपक चौथे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला…सहल यशस्वी केलयब्द्द्ल प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी सर्वांचे आभार मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button