सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

“आम्हाला शिकवू द्या” यासाठी प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा ; सांगोला तालुक्यातून बहुसंख्येने शिक्षक उपस्थित राहणार

प्रचंड प्रमाणात असणारी अशैक्षणिक कामे, सरकारचे शाळांचे खाजगीकरण धोरण, गोरगरीब बहुजनांच्या मुलांना शिकण्यापासून वंचित ठेवण्यासाठी न होणारी शिक्षक भरती या सर्वांमुळे शिकवण्याऐवजी इतर शैक्षणिक कामात शिक्षक गुंतत असल्याने आम्हाला शिकवू द्या यासाठी शिक्षक नेते मा. संभाजीराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर गांधी जयंतीचे औचित्य साधुन 2 ऑक्टोबर रोजी भव्य असे आक्रोश मोर्चे काढण्यात येणार असून या मोर्चात सांगोला तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी असे आवाहन सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन आवताडे,जिल्हा सोसायटी संचालक गुलाबराव पाटील, दीपकआबा प्राथमिक शिक्षक पतसंस्था चेअरमन कुमार बनसोडे यांनी केले आहे.

या मोर्चाद्वारे शिक्षकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. शाळाबाह्य शैक्षणिक कामे बंद करा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना देऊ नयेत, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, लोकप्रतिनिधी कडून होणारी अवमानकारक वक्तव्ये थांबविण्यात यावीत, मुख्यालयी राहणे अट रद्द करावी, शिक्षकांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना सुरू करावी, तसेच जिल्हास्तरावरील प्रलंबित असलेली केंद्रप्रमुख पदोन्नती त्वरित पार पाडावी, मेनंतर उर्वरित शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती द्यावी, सेवा पुस्तकांची पडताळणी करून घ्यावी, या व अशा अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांनी ताकद दाखवणे गरजेचे असून तालुक्यातील शिक्षकांनी मा.म.ज. मोरे, मा अनिरुद्ध पवार यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर येथील मोर्चास दु.२ वा.चार पुतळा येथे आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन तालुका संघाचे सरचिटणीस वसंत बंडगर व तालुका सोसायटी व्हा. चेअरमन बाबासाहेब इंगोले यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, शिक्षक नेते केशवराव घोडके, विकास साळुंखे पाटील, जिल्हा सल्लागार रफिक मुलाणी, संजय काशीद पाटील, तानाजी खबाले, विश्वंभर लवटे, तानाजी साळे, विलास डोंगरे,निसार इनामदार,महादेव नागणे, संजय गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, नागेश हवेली, बापू भंडगे, युवराज मागाडे, रवींद्र जवंजाळ, माणिक मराठे, गोविंद भोसले, रफिक शेख,विजयकुमार इंगवले, नितीन गवळी, कैलास मडके, संतोषकुमार निंबाळकर, शैलेश पवार,गणेश व्हनखंडे, सुमन बगले, सावित्रा कस्तुरे,अंजली बिराजदार, राजेश्वरी कोरे, कमल खबाले पल्लवी मेणकर सह संघप्रेमी शिक्षक व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!