मेडशिंगी येथील लेंडवे- पाटील वस्ती या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…

रोटरी क्लब सांगोला व वनविभाग सांगोला यांच्या वतीने आज मेडशिंगी येथील लेंडवे – पाटीलवस्ती या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन रो. माणिक भोसले यांचे होते. यांनी वन्य जीवा विषयी समाजाने कसे राहावे. त्यांच्या संरक्षणांनी आपले हित होते व वन्यजीव किती महत्त्वाचे आहेत अशी माहिती दिली.
कार्यक्रमाची संकल्पना रो. मच्छिंद्र सोनलकर आणि मेडशिंगी गावातील रोटरी चा आरसीसी क्लब त्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांची होती. सदर कार्यक्रमासाठी वन विभागाच्या वतीने श्री.जाधवर सर , मुंडे सर इंगवले मॅडम वरकटे इत्यादी अधिकारी हजर होते.
मेडशिंगी येथील या आरसीसी चे काम बघून मनोगत व्यक्त करताना जाधवर सर यांनी 101 रोपे मोफत दिल्याचे जाहीर केले व ही रोपे पुढील वर्षी व्यवस्थित जतन केल्याचे दिसले तर पुढच्या वर्षी अजून 101 रोपे मोफत देण्याचे मान्य केले.
याप्रसंगी बोलताना रोटरीचे अध्यक्ष साजिकराव पाटील यांनी मेडशिंगी येथील आरसीसीच्या कामाबद्दल कौतुक केले व रोटरीच्या माध्यमातून आरसीसीच्या सहकार्याने ग्राम परिवर्तनाचा प्रकल्प कशाप्रकारे राबवला जाणार आहे. त्याची माहिती दिली. महिलांचे आरोग्य, शालेय शिक्षणामधील सुधारणा, आरोग्यविषयक जागृती, नागरिकांमधील अज्ञान अंधश्रद्धा दूर करणे, शेतीविषयक जागृती, उत्पन्न वाढीसाठीचे प्रयत्न, सेंद्रिय शेतीसाठीचे प्रयत्न अशा विविध स्तरांवरती रोटरी ग्राम परिवर्तनाचा कार्यक्रम चालणार आहे आणि त्यामध्ये आरसीसी चे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे असे अध्यक्ष यांनी सांगितले.
प्रत्येक कामात अत्यंत आनंदाने भाग घेणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानले. रोटरीच्या कार्यक्रमासाठी रो. संतोष भोसले रो. हमीदभाई शेख रो. हळळीसागर शरणाप्पा रो. विकास देशपांडे रो. विजय म्हेत्रे रो. श्रीपती आदलिंगे रो.डॉ. अनिल कांबळे असे सर्व सभासद हजर होते.