पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडून प्रा.अमित घाटुळे यांचे अभिनंदन

सांगोला(प्रतिनिधी):-शहरातील प्रा.अमित उत्तमराव घाटूले याना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून अभिनंदन व शुभेच्छा पत्र प्राप्त झाले आहे.त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सध्या सर्वत्र लागू असणारा 10+2+3 हा अभ्यासक्रम बंद होणार असून सन 2025 असून नवीन अभ्यासक्रम व पॅटर्न राबविला जाणार आहे. केंद्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक शिक्षक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदला होता.या कार्यक्रमात अमित यांनी देखील सहभाग घेवून मतप्रदर्शन केले होते. त्याबद्दल मोदी यांनी मतप्रदर्शन केल्याबद्दल अमित यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व शिक्षकांनी केलेल्या सूचनांचा आदर व स्वीकार करून भारताच्या शतक महोत्सवी स्वतंत्र दिंन वर्षा पर्यंत भारत एक गौरवशाली राष्ट्र बनेल, असा आशावाद मोदी यांनी व्यक्त केला आहे. सन 2047 साली भारतीय स्वातंत्र्याचा शंभरावा वर्धापन दिन आहे.त्यावेळी भारताचा संपूर्ण जगात दबदबा असेल व त्यासाठी आपणा सारख्या शिक्षकांचे संस्कार व योगदान महत्वाचे असणार आहे, असे मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.
अमित घाटुळे हे सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेज चे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.उत्तमराव घाटुळे यांचे सुपुत्र असून ते सध्या पुणे जिल्ह्यात नवोदय विद्यालयात अध्यापन करत आहेत. ते क्रीडा शिक्षक असून शिक्षण शास्त्र ( क्रीडा ) परीक्षेत सोलापूर विद्यापीठात सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत.या अगोदर त्यांनी सांगोला महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे.