मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सांगोला शहरात जुलूस

सांगोला (प्रतिनिधी):-मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अहले सुन्नत वल जमात शहर सांगोला जशने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने सांगोला शहरात शुक्रवार (दि.29 सप्टेंबर) रोजी भव्य असा जुलूस काढण्यात आला
पैगंबर जयंती व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा व बंधुभाव राखण्याच्या उद्देशाने दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस काढण्यात आला होता. जुलूस मध्ये लहान मुले, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या जुलूसमध्ये मक्का मदिना याची प्रतिकृती तसेच सजवलेल्या रिक्षा, कार, घोडे आदींनी शोभा आणली होती. जुलूसचा प्रारंभ जामा मस्जिद येथून करण्यात आला होता. वज्राबाद पेठ, जय भवानी चौक, मेन रोड, आलराईन नगर मार्गे महात्मा फुले चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जामा मस्जिद येथे सांगता करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी जुलूस मधील समाज बांधवांना विविध संघटनांच्या वतीने खाऊ, मिठाई ,सरबत वाटप करण्यात आला.