सांगोला येथील शालन चांदणे यांचे निधन

सांगोला – शहरातील जांगले वस्ती परिसरात राहणाऱ्या शालन अरुण चांदणे यांचे काल रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.निधना समयी त्यांचे वय ६५ होते. काल दुपारी सांगोला येथील जुन्या मेडशिंगी रोड वरील लिंगायत स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात दोन विवाहित मुले सचिन चांदणे व पिंटू चांदणे,एक विवाहित मुलगी, पती अरुण चांदणे,सुना – नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा तिसरा दिवस विधी कार्यक्रम उद्या मंगळवर दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजता मेडशिंगी रोड वरील लिंगायत स्मशान भूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.