सांगोला रोटरी क्लबच्यावतीने स्वच्छता मोहिम संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगोला या ठिकाणी महात्मा फुले चौक ते एसटी स्टँड परिसर या ठिकाणी रविवार दि.1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
काल दिवसभर सतत पाऊस पडत असताना सुद्धा रोटरीच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमांमध्ये 25 रोटरी सदस्यांनी भाग घेतला. तसेच परिसरात स्वच्छता करत असताना नगरपालिकेची गाडी कचरा उचलण्यासाठी रोटरी सोबत होती. सांगोला आगारातील स्वच्छता करताना आगाराचे प्रमुख निसार नदाफ यांनी चौकशी केली. व रोटरीचे आभार व्यक्त केले. कोणतेही समाजसेवेचे काम करताना फार कोणाची परवानगी काढली जात नाही कारण मदतीचे काम सेवेचे काम हे सांगून त्याची जाहिरात करून करावयाचे नसते या भूमिकेतून एसटी स्टँड परिसरातील स्वच्छता रोटरी करत होती त्यावेळी स्वतः आगार प्रमुख आले व कोणत्या संस्थेमार्फत हे काम चालू आहे. अशी त्यांनी चौकशी केली.रोटरीच्या सामाजिक कामाबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांनी रोटरी सभासदांना चहापाणी करून आभार मानले.
स्वच्छतेच्या याच कार्यक्रमाला अनुसरून सांगोला रोटरी क्लबने रेल्वेस्टेशन परिसरात स्वच्छता केली. रेल्वे स्टेशन परिसर अत्यंत स्वच्छ व सुंदर बनवण्यामध्ये स्टेशन मास्तर सिंग साहेब यांनी फार मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांनी 8 दिवसापूर्वी रोटरीला स्वच्छता करण्यासाठी येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रोटरी क्लबने स्टेशन परिसरात सुद्धा स्वच्छता मोहीम राबवली. त्यावेळी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. आणि रोटरीच्या वतीने स्टेशनवरती ठेवण्यासाठी 2 डस्टबिन भेट देण्यात आले. सिंग साहेबांनी रोटरीचे आभार व्यक्त केले. व त्यांनीसुद्धा सर्व विद्यार्थी शिक्षकांना व रोटरीसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती.