सांगोला तालुका

सांगोला नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानात उचलला गेला तेरा टन कचरा

सांगोला(प्रतिनिधी):- स्वच्छ भारत अभियान 2.0 ( ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता  लीग 2.0  अंतर्गत स्वच्छ पंधरवडा व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ही मोहीम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत सांगोला नगर परिषदेमार्फत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये सदर अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून इंडियन स्वच्छता लीग 2.0 व स्वच्छ पंधरवडा अंतर्गत पूज्य. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार  01 ऑक्टोबर  2023 रोजी सांगोला नगर परिषदेमार्फत विविध ठिकाणी श्रमदान अभियान राबवण्यात आले.
या अभियानात महाराष्ट्र भूषण श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सांगोले येथील श्रीसदस्य श्री.योगेश तारे, श्री. नवनाथ फुले , श्री. शिवाजी केदार व ईतर श्री सदस्य उपस्थित होते. सदर अभियानांतर्गत अंदाजे दहा ते तेरा टन कचरा गोळा करण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सांगोला येथे वाहतूक करण्यात आला. सदर 20 ठिकाणी राबवण्यात आलेल्या अभियानात सर्व पदाधिकारी व शासकीय कर्मचारी तसेच नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे आयोजन सौ.तेजश्री बगाडे, (शहर  समन्वयक, सांगोला नगरपरिषद) यांनी केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्या. अधीक्षक स्वप्निल हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र गायकवाड, रोहित गाडे,अमित कोरे व विनोद सर्वगोड या सर्व टीमने मेहनत घेतली.

 या अभियानाला सांगोलकरांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या योजनेचा मूळ हेतू काही प्रमाणात तरी साध्य झाल्याचे समाधान आहे. यातून पर्यावरण संवर्धनाचा एक चांगला संदेश शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचेल..
स्वप्निल हाके , कार्यालयीन अधीक्षक सांगोला नगरपरिषद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!