सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

वक्तृत्व स्पर्धेतून प्रेरणा घेत नातीने केले आजीचे नेत्रदान ; शिंदे परिवाराचा स्तुत्य निर्णय!

सांगोला ( प्रतिनिधी )- वक्तृत्व स्पर्धेतून प्रेरणा घेत आजीचे निधन झाल्यानंतर नातीने नेत्रदानाचा निर्णय घेतला व नेत्रदान करून नेत्रदान चळवळ गतिमान करण्यासाठी शिंदे परिवाराने मोठे योगदान दिले आहे.
             सांगोला महाविद्यालयाची बीसीए भाग २ ची विद्यार्थिनी कु. सृष्टी दीपक शिंदे (सांस्कृतिक विभाग) हिची आजी पद्मावती विनायक शिंदे (वय ६८ ) रा. जत यांचे १ ऑक्टोंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील महिन्यात ७ सप्टेंबर रोजी सांगोला महाविद्यालयात नेत्रदान पंधरवाडा निमित्त आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, सांगोला महाविद्यालय सांगोला, दिशा मेडिकल फॉउंडेशन तसेच जिल्हा अंधत्व निवारण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सृष्टीने प्रथम क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन तिने आजी पद्मावती शिंदे यांचे निधन झाल्यानंतर आजीच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला व तातडीने वेळेत नेत्रदान केले. या सामाजिक  कार्यात सोलापूरचे नेत्रदान समुपदेशक विकास लिंगराज आणि लायन्स क्लब नेत्रपेढी विभाग, मिरज टीमचे सहकार्य लाभले.
         कु. सृष्टी शिंदे आणि तिच्या परिवाराच्या या निर्णयाबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी स्वागत केले आहे. शिंदे परिवाराच्या या निर्णयामुळे नेत्रदान चळवळीला मोठे बळ मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!