डॉ समाधान भारत गरंडे यांची पशुधन अधिकारी वर्ग-१ पदी निवड

नंदेश्वर(वार्ताहर):-महाराष्ट् लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पशुधन अधिकारी वर्ग -1(class -१)या परीक्षेत तालुक्यातील नंदेश्वर चे माजी सरपंच भारत शंकर गरंडे यांचे चिरंजीव डॉ समाधान भारत गरंडे यांनी 62 वा क्रमांक मिळवत हे यश संपादन केले.
त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसनेर वस्ती नंदेश्वर येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मंगळवेढा येथे तर बी . व्ही.एससी चे शिक्षण व्हेटर्नरी कॉलेज परभणी ते झाले एम व्ही सी शिक्षण सध्या शिरवळ येथे घेत असून तो अंतिम वर्षात शिकत असताना त्याची निवड झाली. समाधान नेअतिशय कष्टातून मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद् बद्दल नंदेश्वर च्या सरपंच सजाबाई दादासाहेब गरंडे गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत गरंडे, पी .एस.आय . समाधान लवटे, पोलीस पाटील संजय गरंडे समस्थ ग्रामस्थ नंदेश्वर यांनी कौतुक करून अभिनंदन केले