सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना प्रेरणादायी ; कृषीमंत्री धनंजय मुंडे व मा. आम. दिपकआबा यांच्याकडून कासाळगंगा फाऊंडेशनचे कौतुक 

देशभरात आज कृषी क्षेत्रात दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. “कासाळगंगा फाऊंडेशन” या संस्थेने मृत अवस्थेत असलेल्या कासाळगंगा या नदीचे तब्बल ५० हून अधिक किलोमीटर लोक सहभागातून पुनर्जीवन करून आधीच वेगळा आदर्श निर्माण केला होता. आता या फाऊंडेशनच्या माध्यमातून महुद आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून खऱ्या अर्थाने राज्यातील इतर शेतकऱ्यासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.
शुक्र दि ६ रोजी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सोनके येथील निवासस्थानी कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे संस्थेचे चेअरमन विजय खबाले, सचिव प्रतीक ताटे यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सांगोला तालुका जरी पर्जन्यछायेच्या प्रदेशात असला तरीही या तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. वर्षानुवर्ष मृत अवस्थेत असलेल्या नदीचे लोकसहभागातून पुनर्जीवन करून या नदीतून हजारो एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असेच हे उदाहरण आहे. नदीचे पुनर्जीवन करून या नदीमुळे बागायत झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून या संस्थेने पिकांच्या लागवडीपासून शेतमालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व जबाबदारी घेणार असल्याने खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होणार आहे. “कासाळगंगा फाऊंडेशन” या संस्थेने केलेले काम पाहून आगामी काळात या फाऊंडेशनसाठी शासनाच्या वतीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू आणि कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीच्या पहिल्या कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटनासाठी आपण स्वतः येऊ असा शब्दही शेवटी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.
१) आमच्यात कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा दुष्काळ नाही..!
राज्यभर सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरीही सांगोला तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. आपल्या कष्टाने त्यांनी सांगोल्याच्या डाळिंबाचे नाव जगभर केले. त्याच कष्टाने आणि जिद्दीने कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी उभा राहत आहे. या संस्थेला येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करू. कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर येथील शेतकरी पुन्हा शेती क्षेत्रात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. 
मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
————————————-
 असे काम करणार कासळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी
कासाळगंगा नदीच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन ही संस्था काम करणार आहे. लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत या शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते-औषधे, शेती उपयोगी औजारे पुरवणे, तसेच शेतीविषयक तज्ञ लोकांचे मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करणे, उत्पादित निर्यातक्षम शेतमालासाठी शीतगृहे निर्माण करून शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्याचा साठा करणे आणि या परिसरातील शेतमाल थेट परदेशात निर्यात करून या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे हेच या संस्थेचे ध्येय आहे ;
विजय खबाले ; चेअरमन, कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!