कोळा येथील विजय सरगर यांच्या डाळींब फळास 171 रुपये विक्रमी दर.

कोळा :-सांगोला तालुक्याला दुष्काळ पाचवीला पूजलेला असतो उन्हाळ्यामध्ये तरी काही भागात टँकर सुरु करण्याची परिस्थिती प्रत्येक वर्षी प्रशासनापुढे निर्माण होते यामध्येही शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर प्रत्येक संकटाला तोंड देत उभा असतो व आपली पिके फुलवत असतो.
यामध्ये चालू वर्षी सांगोला तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी असल्यामुळे व अनेक रोगामुळे डाळींबाचे पीक मोठया प्रमाणात कमी झाले ज्या शेतकऱ्यांनी अनेक रोगांचा सामना करीत बागा जगवल्या या बागाना सुद्धा तेलकट रोगाने कवटाळल्याने डाळींब बागा नष्ट झाल्या अश्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सांगोला तालुक्यातील डाळींब बागायतदार विजय सरगर यांच्या डाळींब फळास प्रति किलो 171 रुपये विक्रमी दर मिळाला असून सदर शेतकऱ्यांने अतिशय कष्ट करुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगल्या प्रकारे डाळींब बाग यशस्वीरित्या जोपासून भरघोस उत्पादन घेतले आहे यामुळे कोळा परिसरात विजय सरगर यांचे कौतुक होत आहे.
चालू वर्षी उन्हाळी बहार मध्ये तेलकट रोगाचे प्रमाण जास्त होते तसेच पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता डाळींब बागायतदार यांच्या साठी अतिशय खराब वातावरण असून सुद्धा विजय सरगर यांनी त्या परिस्थितीवर मात करत यशस्वी बाग पिकवली त्याच्याकडे सध्या 750 झाडे आहेत उन्हाळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये त्यानी पानगळ केली होती प्रत्येक झाडाला सरासरी 30 किलो डाळींब आहेत त्यांच्या 750 झाडामध्ये 17 टन माल निघेल असा अंदाज शेतकरी सरगर यांनी व्यक्त केला आहे यानुसार वार्षिक 27 लाख रुपये उत्पादन मिळाले आहे.
या भागात यावर्षातील हा सर्वांच्च दर असून त्यांचे अभिनंदन शेतकरी वर्गातून होत आहे, गेली पाच वर्ष झाले या क्षेत्रामध्ये ते उत्पादन घेत आहेत परंतु यावर्षीचा जो उच्चांक दर आहे त्यामुळे त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले.
माझी 750 डाळींब झाडे असून चालू वर्षी 171 रुपये दर मिळाला आहे यानुसार 16 ते 17 टन माल निघेल असा अंदाज आहे मला डाळींबासाठी एकूण चार लाख रुपये खर्च आला असुन खर्च वजा करता 23 लाख रुपये नफा मिळेल यासाठी मला आकाराम माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
… विजय सरगर, शेतकरी कोळा