सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरचे बॉक्सिंगमध्ये जिल्ह्यात पुन्हा एकदा वर्चस्व;   सहा खेळाडू जिल्ह्यात प्रथम; विभाग स्तरासाठी निवड

सांगोला ( प्रतिनिधी) मोडनिंब ता. माढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या सहा खेळाडूंनी विविध वयोगट व  वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावित पुन्हा एकदा जिल्ह्यास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये वर्चस्व सिद्ध केले.
यामध्ये सतरा वर्षे वयोगट मुली ५५ ते ५७ वजन गटामध्ये भारती दामोदर गायकवाड इयत्ता ११वी कॉमर्स , ४६ ते ४८ वजन गटामध्ये अनुष्का संजय गायकवाड ११वी शास्त्र,६६ ते ७० वजन गटामध्ये मेहक इरफान मुलाणी. ११वी  कला, ४८ ते ५० वजन गटामध्ये श्रेया बामणे ११वी कला या सर्व खेळाडूंनी  प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १९ वर्षे वयोगट मुली ,४८ ते ५० वजन गटामध्ये स्वप्नजा गवळी इयत्ता ११वी शास्त्र  या खेळाडूनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच १४ वर्षे वयोगट मुले ,४४ ते ४६ वजन गटामध्ये कुमार जैद शरीफ नदाफ इयत्ता  आठवी ,३४ ते ३६वजन गट रविकिरण गायकवाड इयत्ता आठवी प्रथम क्रमांक मिळविला .
   प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.
  सर्व यशस्वी खेळाडूंना  सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्रा.सचिन चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
याशिवाय ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख डी.के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर,प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषन माने यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची खेळाडू  अनुष्का संजय गायकवाड हिने जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर यांचे हस्ते बेस्ट बॉक्सर सन्मानचिन्ह देऊन बेस्ट बॉक्सरच्या  किताबाने सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!