जि.प.प्रा. केंद्रशाळा, महुद बु शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, महुद बु शाळेत दिनांक-२९/०३/२०२३ रोजी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले, या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी आपले विविध प्रयोग सादर केले.
विज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक जागृती होते.. वैज्ञानिक घडामोडीमागील कारणीमिमांसा समजावी हा हेतु व उद्धेश आहे तसेच विद्यार्थ्यांनी सुश्म व स्वयंअध्ययनाने विचार करावा हा हेतु विज्ञान प्रदर्शनाचा आहे..
या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समयी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कैलास खबाले, उपाध्यक्ष- सौ उमा सरतापे, श्री शकील तांबोळी,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संजय पाटील, श्री संतोष पाटील, श्री सुनील जाधव, सौ अर्चना चव्हाण, श्री दीपक पवार, महूद शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ जाधव सर, केंद्रप्रमुख श्री रवींद्र पाटील सर, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महूद शाळेतील-श्री संजयकुमार भोसले सर, श्री मीनाक्षी टकले मॅडम, श्री महादेव नागणे सर, श्रीमती सुलभा भांबुरे मॅडम, सौ कमल खबाले मॅडम, सौ सरोजिनी देशमुख मॅडम, सौ संगीता केसकर मॅडम, सौ शितल चव्हाण मॅडम, मॅडम, , या शिक्षक वृंदांचे अनमोल असे सहकार्य लाभले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना श्री शंकर कांबळे सर, श्रीमती सुनंदा चव्हाण मॅडम, सौ शोभा पाटील मॅडम, श्रीमती वंदना पाटणे मॅडम, श्री दऱ्याबा येडगे सर या वर्ग शिक्षकांनी प्रयोग सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री-दऱ्याबा येडगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन-श्री महादेव नागणे सर यांनी मानले