राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता पुरस्कार प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

– शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने या कार्यालयामार्फत अनुसूचितजाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता पुरस्कार शिष्यृत्ती या योजनांचा लाभ देण्यात येतो. जिल्हयातील महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2019-20 ते सन 2022-23 मधील बोर्ड यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रस्ताव अजुनही विद्यालयांकडुन आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त न झाल्याने प्रलंबित आहेत. सदर तात्काळ या कर्यालयात पाठविण्यात यावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

इयत्ता 10 वी व इयत्ता 12 मधून बोर्डाच्या यादीत प्रथम आलेले पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव (खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छांयाकित प्रत व जातीचा दाखला, आधार कार्ड मार्कलिस्ट) सर्व आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर या कर्यालयास सादर करण्यात यावेत. अन्यथा सदर रक्कम शासन खाती जमा करण्यात येईल व विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळा, महाविद्यालय राहील याची नोंद घ्यावी. असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button