प्रा . लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला नाझरे ग्रामस्थांचा पाठिंबा

ओबीसी संघर्ष योद्धा प्रा . लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला नाझरे ता. सांगोला येथील सकल ओबीसी समाजाने पाठिंबा जाहीर करून, त्यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करून ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा व यासाठी प्राध्यापक हाके यांना नाझरे गावाची साथ राहील व गाव बंद पाळण्यात आला असे सरपंच संजय सरगर यांनी यावेळी सांगितले.
वडीगोद्री ता. अंबड. जि.. जालना येथे प्राध्यापक हाके व वाघमारे 13 जून पासून उपोषणास बसले आहेत. त्यांनी केलेल्या मागण्या या संविधानिक असून सरकारने तात्काळ त्या मान्य कराव्यात व त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर प्रचंड संताप जनक परिस्थिती निर्माण होईल व या सरकार जबाबदार राहील असे उपसरपंच मधुकर आलदर यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी सर्व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल बंडू मामा आधाटे यांनी आभार मानले.