महाराष्ट्र
उत्कर्ष विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांचे कीर्तन रुपी आध्यात्मिक प्रबोधन; विद्यालयातील जिजाऊ कुलाचा एक उपक्रम

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना कीर्तनाचे रंगी रंगण्याचा विलक्षण अनुभव आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयातील जिजाऊ कुलातर्फेविविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी करण्यात आले होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महर्षी वेद व्यास तसेच जिजाऊ कुलाच्या कुलश्रेष्ठ अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महर्षी वेद व्यास यांचे महत्व विशद करण्यात आले .त्यानंतर ॲडव्होकेट श्रमिका कुलकर्णी तसेच त्यांचे सहकारी श्रद्धा बिडीकर व अभयराज मिले यांनी गुरुपौर्णिमा तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित कर्णमधुर असे किर्तन सादरकेले .विद्यार्थ्यांना कीर्तन हा लोककला प्रकार खूप जवळून अनुभवता आला. यामुळे विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या विविध कार्याची ओळख झाली.
या कार्यक्रमासाठी संस्था कोषाध्यक्षा मा.डॉ.शालिनी कुलकर्णी,प्राचार्य मा.सुनील कुलकर्णी सर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.विश्रांती बनसोडे , उपमुख्याध्यापिका मा.स्वराली कुलकर्णी, उच्च माध्यमिक पर्यवेक्षिका मा. सुनयना मजगे ,माध्यमिक पर्यवेक्षक मा.श्री प्रशांत भोसले , इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम जिजाऊ कुलातर्फे कुलप्रमुख निशा बनसोडे , आयेशा मुलाणी, रेश्मा सर्वगोड तसेच निर्मला भोसले व सर्व जिजाऊ कुलातील विद्यार्थ्यांनी सादर केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थी तन्मय सतीश सप्ताळ व ओवेश जमीर मुजावर तसेच आभार प्रदर्शन समृद्धी संजय शिंदे यांनी केले



