कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक कार्यशाळा संपन्न…

आजच्या काळात मोबाईलचा अतिरेक मोठया प्रमाणात वाढला आहे व मोबाईल वापरामुळे मोबाईल मधून बाहेर पडणारे रेडिशीय मुलांच्या डोळ्यास आपायकारक आहे यामुळे मुलांना डोळ्याचे वेगवेगळे आजार होऊ शकतात यामुळे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा असे वक्तव्य कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालक कार्यशाळेवेळी पालकांना मार्गदर्शन करताना (उपजिल्हा प्रशिक्षण समन्वयक सीबीएसई )प्राचार्य इंदिरा पाटील मॅडम यांनी केले.
यावेळी प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, विनोद देशमुख सर, सरिता लिगाडे मॅडम, कलावती मॅडम, बसवदे मॅडम, अजित मोरे सर. आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
पाटील मॅडम पुढे बोलताना म्हणाल्या पालकांनी आपल्या मुलांसोबत दररोज संवाद साधला पाहिजे, व्यवहार ज्ञान दिले पाहिजे दिवसातून एखादी तर मुलांना घट्ट मिठी मारली पाहिजे यामुळे मुलांची व पालका सोबत एक मैत्रीचे नाते निर्माण होईल याचबरोबर मुले मोठयाचे निरीक्षण करत असतात यामुळे मुलांसमोर जाताना व्यवस्थित जाणे बोलताना व्यवस्थित बोलणे आदी बाबत पालकांनी काळजी घेणे याबाबत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी पालकांनी पाटील मॅडम यांच्याशी आपल्या शंका विचारून निरसन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती काटे मॅडम तर आभार प्रियंका कांबळे मॅडम यांनी केले सदर कार्यशाळेस पालक मोठया संख्येने उपस्थित होते.