सांगोला नगरपरिषद येथे शहर कार्यकारी समितीची बैठक संपन्न; मुख्यधिकारी यांनी घेतला बँकेचा आढावा व केले पुढील कामाचे नियोजन

सांगोला नगरपरिषद केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवीत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील गरीब नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये बचत गट स्थापना व सवलतीच्या व्याज दरात त्यांना कर्ज उपलब्ध करणे, सवलतीच्या व्याज दरात वैयक्तिक कर्ज प्रकरणे, शहरातील युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण,पथविक्रेत्यांना सहाय्य, पीएम स्वनिधी, बेघरांसाठी निवारा इ घटकांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याचे प्रयत्न केले जातात.
या अनुषंगाने सांगोला नगरपरिषदेने शहर कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये आज अखेर झालेल्या कामाचा आढावा बँकेच्या माध्यमातून घेण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) या योजनेच्या माध्यामतून शहरातील ५९७ पथविक्रेत्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज वितरीत करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत शहरातील ६ उद्योजकांना ३५% अनुदानावर कर्ज वितरीत करण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील १५ बचत गटांची व १० वैयक्तिक कर्ज प्रकरणे वितरीत करण्यात आलेली आहेत. याकरिता सांगोला नगरपरिषदेच्या वतीने डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी यांच्या हस्ते शहरातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र , युनियन बँक ऑफ इंडिया व लोकमंगल सह. बँक यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.सुधीर गवळी यांनी पुढील काळात ही बँकांनी बचत गट, पथविक्रेत्यांना व नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम कारण्याचे अवाहन बँकांना केले. सदर बैठकीस सांगोला नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. स्वप्नील हाके, लेखापाल श्री जितेंद्र गायकवाड, लेखापरीक्षक श्री धनाजी साळुंखे, विद्युत अभियंता श्री प्रभाकर कांबळे तसेच बँक व्यवस्थापक श्री दिपक गवळी, श्री अविनाश शिंदे, श्री प्रवीण खटकाळे, श्री सागर माळी, श्री प्रवीण भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी.डी.गायकवाड, श्री कोळी, अरोग्य सहायक, सौ.सुनंदा घोंगडे, अध्यक्ष,कर्तव्य शहरस्तर संघ, सौ.मनीषा हुंडेकरी, सचिव, कर्तव्य शहरस्तर , श्री सचिन भोसले, प्रतिनिधी ग्रामीण जीवन्नोती अभियान श्री शरद थोरात इ सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन श्री बिराप्पा हाक्के, समुदाय संघटक यांनी केले.