शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

सांगोला(प्रतिनिधी):- गेले काही वर्षांत गावचा खुंटलेला विकास आणि निकृष्ट दर्जाची झालेली कामे व भ्रष्टाचाराला वैतागत सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
खवासपुर येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला गेली सहा वर्षे गावातील खुंटलेला विकास रस्ते गटारी आणि शाळा बांधकामांची झालेली निकृष्ट दर्जाची कामे व योजना असुन सुद्धा ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण यामुळे शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते पुरोगामी युवक संघटना प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
यावेळी पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष दीपक गोडसे, डॉ विजयकुमार गायकवाड, मा.पंचायत समिती सदस्य भारत भोसले, माजी चेअरमन माणिक जरे, उपसरपंच नंदकुमार यादव, हरिदास फुले, ग्रामपंचायत सदस्य नितीन जरे, नागनाथ जरे, आप्पासाहेब जरे,शहाजीराव बलवंत, गणेश दिक्षीत,भारत जरे, नामदेव यादव,पोपट जरे, नानासाहेब जरे,प्रविण जरे,निलेश भोसले, नानासाहेब भोसले, विलास जरे साहेब ,सदाशिव ढेरे, आण्णासाहेब ढेरे, मधुकर ढेरे, अजित ऐवळे, विष्णू यादव, अंकुश यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप जरे, विष्णू जरे,बाळासाहेब जरे, अजित जरे,आनंदा भोसले,संभाजी भोसले, श्रीनाथ जरे, बापुराव यादव,दिलीप भोसले,गणेश बोडरे, नेताजी भोसले, धनाजी बोडरे,वैभव ढेरे, आण्णासाहेब भोसले, नामदेव गायकवाड, संजय भोसले, रामचंद्र भोसले, तानाजी जरे,दादासाहेब भोसले,तात्यासाहेब पाटील,उध्दव ढेरे, नितीन फुले, गुलाब बागल, योगेश बलवंत, निरंजन ऐवळे, मारुती बोडरे,विजय बोडरे, श्रीरंग जरे, अनिल जरे,सागर भोसले, अनिल भोसले, चंद्रकांत भोसले, अरविंद यादव,अक्षय यादव, सोमनाथ भोसले,महादेव जरे, संतोष जरे,संजर जरे,रणजित जरे,संजय जरे, गणेश जरे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी शेतकरी कामगार पक्षात शिंदे गटातुन धडाडीचे नेते नरेंद्रबापु जरे, शहाजी जरे, अशोक जरे, अभिमान जरे,मेजर अतुल जरे, अध्यक्ष दुर्योधन भोसले, ब्रम्हदेव जरे, मधुकर जरे सर,अतुल भोसले, नितीन बागल, शिवाजी जरे, रमेश कुंभार, वामनराव जरे, नवनाथ भोसले,ई कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये गेले पाच सहा वर्षांत गावचा खुंटलेला विकास आणि निकृष्ट दर्जाची झालेली कामे होणारा मोठा भ्रष्टाचार यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली गावात पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या कामाची व इतर सर्व ग्रामविकासाच्या कामाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्व नवीन जुन्या कार्यकर्त्यांनी केला.