डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूर विद्याीठाच्या सर्व विद्यार्थ्यासाठी मिळाले रसकट कॅरी ऑन

आपला देश प्रगती पथावर जायचे असेल तर देशातील युवक शिकला पाहिजे शिकाल तर टिकाल या उक्तीप्रमाणे , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या हा विषय सांगोला तालुक्याचे युवानेते, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य व महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांना समजताच त्यानीं त्वरित संपूर्ण माहिती घेऊन व जबाबदारी घेऊन वारंवार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यपीठ सोलापूर मध्ये पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला
डॉ .बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आणि विद्यापीठाणे CARRY ON चा निर्णय लागू करून विद्यार्थ्यांनच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला .
त्यामुळे सोलापूर विद्यपीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब देशमुख सतत विविध अडचणी आणि प्रश्न यांची माहीत घेऊन त्यां अडचणी मार्गी लावतात अश्या त्यांचा कार्याबद्दल व त्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले….तसेच शिवयुनिटी फाऊंडेशनचे सल्लागार प्रा. संदीप क्षीरसागर सर व राज्य समन्वयक ऍड. अभिषेक थोरात सर व प्रा.चंद्रकांत चव्हाण सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला आणि सदिच्छा व्यक्त केल्या.