गोरगरीबांसाठी मोफत आरोग्य सेवा हेच मोदींचे ध्येय – चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी): गरिबांच्या कल्याणासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. देशातील गोरगरीबांसाठी मोफत आरोग्य सेवा देणे हेच मोदींचे ध्येय असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.
       भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगांव येथे मोफत आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले,  पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळत आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दिशेने केंद्रातील आणि राज्यातील आरोग्य विभाग काम करत आहे. मोदी सरकार आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर देत आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या वतीने सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करून प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मोफत देण्यात येणार आहे.
      यावेळी माजी सभापती संभाजी आलदर, दुर्योधन हिप्परकर, विष्णू सरगर,महादेव पुजारी, बीरा आलदार, विलास व्हनमाने, विठ्ठल कोळेकर, गब्बर कर्चे, पपू कर्चे, शिवाजी आलदर, अजित तवते, उत्तम सरगर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कांबळे, ग्रामपंचायत सदस्या विठाबाई कर्चे, ग्रामपंचायत सदस्य मोहन घोडके, श्रीनिवास घोडके, मोहन बजबळे, सागर बजबळे, साहेबराव घोडके, बापू बिले, विजय घोडके, प्रकाश सकट, गोविंद सकट, हरी घोडके, साहेबराव घोडके, शंकर बिले, रमेश ढेंबरे, ग्रामपंचायत सदस्य सनी दौड, ग्रामपंचायत सदस्य महादेव घोडके, विश्वास करडे, राहुल भजबळे, अर्जुन सुतार, आबा खताळ, वसंत कांबळे, संजय बिले, अभिजीत ढेंबरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button