आपले ध्येय निश्चित करुन स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागा-प्रांताधिकारी समाधान घुटूकडे; न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाचे क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान यश

सांगोला (प्रतिनिधी):- मी सुद्धा सर्वसाधारण कुटुंबातून आलेला असून जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (वर्ग – एक) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज प्रांताधिकारी या पदावर ती कार्य करत आहे. मी इयत्ता अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली व त्यामध्ये यशस्वी झालो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आत्तापासूनच आपले ध्येय निश्चित करा व स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागा, असे आवाहन प्रांताधिकारी समाधान घुटूकडे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाने किक बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर,खोखो, कबड्डी,कुस्ती, स्विमिंग स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये सर्व खेळाडूंचा,मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी श्री.घुटूकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे सर होते.
श्री.घुटूकडे पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा संदर्भात काही शंका असल्यास दूरध्वनी क्रमांक वर संपर्क करण्याचे सांगितले. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा व बाह्य परीक्षा विभाग अंतर्गत मी आपणास मार्गदर्शन करेन असे सांगून सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत मध्ये बोलताना प्राचार्य हेमंत आदलिंगे सर यांनी सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला हे गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असते त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही अग्रेसन अग्रेसर राहण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला आहे. याचबरोबर कॉलेजमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा व बाह्य परीक्षा विभाग अंतर्गत कॉलेजमधील अनुभवी तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. याप्रसंगी खेळाडू मधून अंकिता दत्तात्रय खंडागळे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
बालेवाडी पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी अंकिता दत्तात्रय खंडागळे व 19 वर्षे वयोगटा खालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व मुलींचा, त्यांच्या पालकांचा व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक हिम्मत साळुंखे सर, करणवर सर यांचा प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी श्री समाधान घुटुकडे साहेब व कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे सर यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था सदस्य डॉ. अशोक शिंदे सर, दीपक खटकाळे सर, जयंत जानकर सर, उपप्राचार्य केशव माने सर, पर्यवेक्षक संजय शिंगाडे सर, जुनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मराठी विभागाच्या सौ. जुलेखा मुलानी मॅडम यांनी केले तर, आभार श्री. देवेन लवटे सर यांनी मानले.