सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची क्षेत्रभेट संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची क्षेत्रभेट सातारा,कासपठार ठोसेघर धबधबा व सज्जनगड या ठिकाणी संपन्न झाली.
सकाळी ठीक 5-00वा.विद्यालयातून प्रस्थान झाले.सर्वप्रथम युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या संरक्षक यादीत समावेश केलेल्या कासपठार येथे जाऊन असंख्य प्रकारची रानफुले यामध्ये सोनकी, रानभेंडी,रानजास्वंद इ. प्रकारची फुले पाहिली अतिशय नयनरम्य असे पुष्पपठार बघून ठोसेघर धबधबे पाहिले.यानंतर समर्थ रामदासांचे अंतिम विश्रामस्थान असलेल्या सज्जनगड येथे भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गडावर पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच श्रीरामाचे मंदिर व समर्थांच्या मठाचे दर्शन घेतले. यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन ही सहल सुखरूप विद्यालयात पोहचली.
ही क्षेत्रभेट मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली यासाठी विभाग प्रमुख श्री. संतोष बेहेरे व संगमेश्वर घोंगडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.