पायोनियर स्कूल य. मंगेवाडी चे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशाचा धूमधडाका कायम.

पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी शाळेच्या 3 खेळाडूंनी दमदार यश संपादन करून पायोनियर शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील आपल्या यशाचा धूमधडाका कायम ठेवला आहे.
आज सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत गोळाफेक मध्ये कुमारी पल्लवी दत्तात्रय येलपले हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिहेरी उडी क्रीडा प्रकारात मनोज रामचंद्र येलपले याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.तर थाळी फेक मध्ये कुमारी सलोनी रामचंद्र येलपले हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.पायोनियर शाळेची खेळाडू कुमारी पल्लवी दत्तात्रय येलपले हीची विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पायोनियर शाळेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतात.क्रीडा क्षेत्रात दरवर्षी पायोनियर शाळेचे खेळाडू चमकदार कामगिरी करून नावलौकिक मिळवितात.यंदा ही पायोनियर शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र पायोनियर शाळेच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना शाळेचे प्राचार्य श्री अनिल येलपले सर शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मोहन वाघमारे सर पालक श्री.दत्तात्रय येलपले , श्री.दत्तात्रय मासाळ ,शाळेचे सर्व विभाग प्रमुख श्री आशुतोष रुपनर सर श्री.प्रवीण कोरे सर श्रीमती राऊत मॅडम आणि सौ येलपले मॅडम यांच्या परिश्रमातून हे अनमोल यश संपादन झाले.