जुजारपूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी दादासाहेब हिप्परकर उपाध्यक्षपदी सतिश गुरव यांची निवड

सांगोला तालुक्यातील जुजारपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दादासाहेब हिप्परकर व उपाध्यक्षपदी सतीश गुरव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ मानाचा फेटा देऊन राजकुमार व्हनमाने मित्र परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ नेते मंडळी उपस्थित होते..
या कार्यक्रमास सचिन तंडे सर, भारत व्हनमाने, संजय खरात, राजकुमार व्हनमाने, समाधान व्हनमाने, अंबादास तवटे, युवराज व्हनमाने,प्रवीण व्हनमाने,दुर्वास हिप्परकर, विजय खटके, प्रकाश हिप्परकर, युवा नेते विक्रम खरात, स्वप्निल व्हनमाने, अण्णासो व्हनमाने, यांच्यासह राजकुमार व्हनमाने मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.