सांगोल्याचा विकास पुरुष पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील

1990 साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी सांगोल्यातील प्रमुख पक्ष शेकाप व काँग्रेस होते शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार भाई गणपतराव देशमुख हे फिक्स होते पण काँग्रेसचा उमेदवार कोण यावर तालुक्यात अनेक चर्चा होत्याअनेक भागातील कार्यकर्ते अनेक उमेदवारावर चर्चा करीत असताना च अचानक काँग्रेस पक्षाची उमेदवारी तालुक्यात कोणालाच माहित नसणाऱ्या एका युवकाला म्हणजेचआत्ताचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांना मिळाली आणि तालुक्यातील तमाम जनतेच्या भुवया उंचावल्या कारण हे नाव महाराष्ट्र काँग्रेस व देशाच्या काँग्रेसमध्ये मोठे चर्चेतील नाव होते पण तालुक्याला हे नाव परिचित नव्हतं कारण एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या या युवकाच्या कुटुंबाला कसलाच राजकीय वारसा नव्हता.
चिकमहुद गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला सर्वसामान्यांचे पोरगं देशात एक सर्वात मोठ्या काँग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन सांगोल्याच्या राजकारणामध्ये उतरले आणि भल्या भल्या इच्छुकांची झोप उडाली शेकाप ने अल्पसंपुष्टांना हाताशी धरल्याने शहाजी बापूंचा निसटता पराभव झाला. पण पराभवाने खचणारे शहाजी बापू नसल्याने 1994 साली सांगोला सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेस मधील पहिल्या फळीतील नेत्यांनी शेकाप सोबत युती केली तरीही शहाजी बापूंनी धीर न सोडता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना कारखान्याच्या उमेदवारी देऊन सांगोल्याचं एकतर्फी झालेलं राजकारण ढवळून काढलं सांगोला तालुक्यातील उपजीवेकीसाठी बाहेरच्या राज्यात गेलेले सभासद बापूंच्या आदेशाने सांगोल्यात आले. परंतु तालुक्यातील सगळेच दिग्गज एका बाजूला असताना बापूंनी या दिग्गजांचा निवडणुकीत काटा केला बापू सोडून बापूंचं पॅनल हरलं पण कारखान्याला उभा केलेली शेतकऱ्यांची पोरं त्या भागातील नेते म्हणून उदयाला आली.
कारखान्याच्या निवडणुकीनंतर माझ्या दुष्काळी तालुक्याला कृष्णेचं पाणी मिळालं पाहिजेल म्हणून सांगोल्यात प्रचंड मोठी पाणी परिषद आयोजित केली आणि त्या सभेत मला आमदार करा मी तुम्हाला हे पाणी आणून दाखवतो असं अभिवचन दिल आणि १९९५ च्या निवडणुकीत बापूंना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि निवडणूक दुष्काळ आणि पाणी यावर झाली ती निवडणूक बापूंनी भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधा जिंकली युवक महिला व जनतेचा आनंद भरभरून वाहू लागला बापू ट्रेन ने मुंबईला गेल्यानंतर त्या वेळच्या V T स्टेशनवर बापूला पाहण्यासाठी प्रचंड लोकांनी गर्दी केली होती विधानभवनात सर्व कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यापर्यंत सगळेजण बापूंना निरखून पाहत होते.
1955 ला बापू काँग्रेस पक्षाचे आमदार झाले व राज्यात युतीचे सहकार आलं बापूंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून तेरा दुष्काळी तालुक्यासाठीची टेंभू म्हैसाळ योजना मंजूर करून घेतली विमेचं पाणी 81 गावांना पिण्यासाठी मंजूर करून घेतलं या प्रचंड मोठ्या योजना मंजूर करून घेतल्या पण या कामाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील जनतेकडे दुर्लक्ष झाले विरोधकांनी युवकांना तुमचे आमदार कुठे आहेत असे प्रश्न गावोगावी विचारले एवढ्या मोठ्या विकासकामांचा पाठपुरावा करताना तालुक्याकडे दुर्लक्ष होते हे कार्यकर्त्यांना जनतेपुढे मांडता आले नाही त्यातच 1999 च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आठ ते दहा दिवस उरले असता विरोधकांनी बापूंना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली काँग्रेस व राष्ट्रवादीने बापूंना उमेदवारी दिली नाही. बापूंनी कोर्ट परवानगी घेऊन विधानसभेच्या निवडणुकीचा अपक्ष फॉर्म पोलीस व्हॅन मध्ये येऊन भरला आणि तमाम तालुक्यातील लोकांनी
बापूंना ढाण्या वाघ ही पदवी दिली निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादीचा विजय झाला बापूंना साठ हजार मते मिळाली व इतर कुठल्याही पक्षाला डिपॉझिट राखता आलं नाही.
2004 2009 2014 या निवडणुका बापूंचा सतत पराभव होऊनही घरची शेतीवाडी जाऊन हीप्रचंड आर्थिक संकट व दारिद्र्य दाराच्या तोंडाशी येऊन ही बापू कसलीही विचलित झाले नाहीत बापूंचा एकच ध्यास होता या तालुक्यातील सर्व समाजातील लोकांना ताट मानेने व स्वाभिमानाने जगता आले पाहिजे त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे सततच्या पराभवामुळे बापू आपण राजकारण सोडलं तर काय होईल तेव्हा शांतपणे बापू म्हणाले मी जर यांच्या विरोधात नाही लढलो तर तालुक्यातील स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सत्ता उपभोगणारी तीच कुटुंब तीन पिढ्या नेते म्हणून तालुक्यात वावरतात मला त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांची व गोरगरीब दलितांची पोर त्या ठिकाणी नेते म्हणून बघायची आहेत या तालुक्यातील ठराविक घरांची मक्तेदारी मोडून काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही एवढ्या एका विश्लेषणावर मी चुंबकासारखा त्यांच्या जवळ जाऊन प्रेमात पडलो.
2019 ची निवडणुकीत बापूंनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेचा अर्ज भरला आणि ती निवडणूक तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने बापूंनी जिंकली कार्यकर्त्यांचा राबता ऑफिस आणि घराकडे वाढू लागला आणि मग लोकांना समजलं बापू दोन पत्र्यांच्या खोल्याच्या घरामध्ये राहतात.
बापूंच्या विचारांची उंची विधानसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच लोकांना कळली बापूंनी आमदार झाल्यावर उजनी धरणाचे दोन टीएमसी पाणी राजकीय अनस्तेमुळे धरणात पडून होतं ते हक्काचं पाणी तालुक्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मंजूर करून त्या कामाची निविदा ही दिली. तसेच टेंभू आणि म्हैशाळच्या 1995 च्या काळात मंजूर केलेल्या साडे सहा टीएमसी पाण्यात आत्ता नव्याने दोन टीएमसी पाणी मंजूर करून घेतले त्यामुळे तालुक्यातील उर्वरित सर्व गावे सिंचनाखाली आणण्याचे काम बापूंनी करून दाखवले 1972 च्या दुष्काळात लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमीतून बांधलेल्या पाझर तलावांचे 10 स. घ. मी. च्या पुढील 35 ते 40 तलावांचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून, 1995 ला मंजूर केलेल्या 81 गावाच्या पिण्याच्या पाण्याची योजना कालबाह्य झाली होती म्हणून तीच एम जी पी कडील नवीन योजना मंजूर करून आणली सर्व जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण करून जवळजवळ सर्व गावातील किमान तीन पासून चार, पाच, सहा डांबरी रस्त्याने प्रत्येक गाव जोडलं आहे.
तालुक्यातील दुग्ध व्यवसाय मोठा असल्याने वाड्यावर त्यावरील ही रस्ते बापूंनी डांबरीकरणांनी जोडण्यास सुरुवात केली नवीन वीज बोर्डाचं ऑफिस मंजूर करून कार्यान्वित केले मुस्लिम समाजासाठी महाराष्ट्रातील प्रशस्त असा स्वप्नातील इदगा बांधून दिला तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन तालुक्यात नवीन उद्या व शासकीय विश्रामगृह क्रीडा संकुलासाठी मोठा निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात डायरेक्ट केंद्र व राज्याचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत सर्व घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी फेरसर्वे तालुक्याला माहित नसणारे पंचवीस पंधरा अल्पसंख्यांक सामाजिक न्याय 30-54 , 50-54 हे निधी मोठ्या प्रमाणावर आणले.
सांगोला शहरांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी निधी, शहरांसाठी भुयारी गटार योजना अशी अनेक विकास कामे कसलाही गर्व न करता बापूंनी तालुक्यासाठी आणली म्हणूनच की काय अचानकपणे सांगोल्याचे बापू एका डायलॉग ने जगभर प्रसिद्ध झाले यामुळे या तालुक्यातील गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या दलितांच्या आशीर्वादाने सांगोल्याचे बापू सेलिब्रिटी आमदार झाले. बापूंचं 5000 कोटी रुपये विकास कामाचं उद्दिष्ट सत्यात उतरताना दिसत आहे या आमदार शहाजी बापू पाटील यांना उदंड आयुष्य लाभो ही तमाम तालुका वाशी यांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना.
प्राध्यापक संजय देशमुख