बाळकृष्ण विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नुकत्याच सोलापूर येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावरती झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगटामध्ये पूजा घोगरे या विद्यार्थिनीने 200 मिटर धावणे व ११० मिटर अडथळा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक,ऋषिकेश अळनुरे १०० मिटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याचबरोबर १९ वर्षे वयोगटामध्ये मुले ४०० मिटर रिले धावणे या स्पर्धेमध्ये ऋषिकेश अळनुरे,स्वानंद खांडेकर,अरमान आतार,रणजीत कळकुंबे,साहिल मोरे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तसेच १९ वर्षे वयोगटांमध्ये मुली 400 मिटर रिले धावणे या स्पर्धेत पूजा घोगरे,स्वप्नाली मेटकरी,सुभिक्षा गोरड,दिक्षा भानुदास,वर्षा मोटे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर साक्षी दोलतडे ३००० मिटर धावणे,स्वप्नाली मेटकरी २०० मिटर धावणे,साक्षी मेटकरी ४०० मिटर धावणे या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक प्राप्त करुन यश मिळविले आहे.
या यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे व विठ्ठल एकमल्ली,मनोहर बंडगर,गिरीश चौगुले,नवनाथ मेटकरी या मार्गदर्शक शिक्षकांचे श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज,देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,श्री बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर,संस्थेचे सर्व संचालक मंडळ,सभासद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.