नंदेश्वरकरांना ओढ लागली बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्याची

नंदेश्वर ता-मंगळवेढा येथील समर्थ सदगुरू बाळकृष्ण महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याची सुरुवात दिनांक १९ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर रोजी नंदेश्वरच्या पुण्यनगरीत मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन खऱ्या अर्थाने समस्त नंदेश्वरकरांना आतुरता बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्याची लागलेली पहायला मिळत आहे.
कारण ह्या माऊली सप्ताहाची ओढ युवकवर्ग,माहेरवाशिणी,सासुरवाशिणी,ज्येष्ठ नागरीकांसहीत,बालगोपांलाना आहे.या सप्ताहात इंचगिरी येथुन बाळकृष्ण माऊलींची ज्योत आणली जाते.ज्योत आणण्यासाठी युवकांची मोठी गर्दी असते.त्यामुळे सध्या टि-शर्ट,बनियन युवकवर्गाकडुन आपआपल्या गुप्रचे छापण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे.त्याचबरोबर महीलावर्गाकडुन घरातील स्वच्छता करण्यास सुरुवात झाली असुन ज्येष्ठ नागरीकही सायंकाळी सहा वाजता माऊलींच्या मंदिरात येऊन बालगोपांलाना पाऊंड कसे खेळायचे,टाळ कसे वाजवायचे व पालखीपुढे अभंग कसे म्हणायचे याचे प्रशिक्षण देताना पहावयास मिळत आहेत.पाच दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यात संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी असतात, पहाटे चार वाजता काकड आरती होऊन पाच वाजता प्रभात फेरीला सुरुवात होते या प्रभात फेरीमध्ये माऊली भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
त्याचबरोबर माऊली परीवाराकडुन मंदिर आणि परीसरातील स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे.एकंदरीत समस्त नंदेश्वरकराकडुन समर्थ सदगुरू बाळकृष्ण महाराज सप्ताहासंदर्भात अगदी मनापासुन तयारी करताना भक्तगण पहावयास मिळत असुन सर्वांनाच माऊली पुण्यतिथी सोहळ्याची आतुरता लागलेली आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यात मुंबई, कर्नाटकसह विविध ठिकाणाहुन गुरु बंधु-भगिनीं नंदेश्वरमध्ये दाखल होतात व मोठ्या उत्साहात पुण्यतिथी सोहळा पार पाडतात.
– बाळासाहेब महाराज,मठाधिपती नंदेश्वर