*सांगोला विद्यामंदिर इ११ वी सी.ई.टी वर्गाची विद्यार्थी – पालक- शिक्षक सभा संपन्न*

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने पूज्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी व बारावी शास्त्र शाखेसाठी सी.ई.टी.परीक्षा मार्गदर्शन केले जाते यानुसार सी.ई.टी. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम नियोजन, विविध सूचना, मार्गदर्शन व अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने आयोजित इयत्ता अकरावी शास्त्र सी.ई.टी.वर्ग विद्यार्थी- पालक- शिक्षक सभा संपन्न झाली.
सुरुवातीला प्रा.जालिंदर मिसाळ यांनी अभ्यासक्रम नियोजन, झालेल्या परीक्षा निकालाचे विवेचन करत बारावी बोर्ड परीक्षा अभ्यासक्रम ,सी.ई.टी. परीक्षा अभ्यासक्रम नियोजन व यश मिळविण्यासाठी करावयाची तयारी या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पालक शंकर शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केली. या विद्यार्थी – पालक – शिक्षक सभेमध्ये उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, शास्त्र शाखा ज्येष्ठ अध्यापक प्रा.दिलीप मस्के,सी.ई.टी. बॅचप्रमुख प्रा.जालिंदर मिसाळ यांनी विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकाचे निरसन केले. उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रथम सत्र परीक्षेची चांगली तयारी करावी असे सांगत यापुढे होणाऱ्या कोणत्याही परीक्षेला गैरहजर राहू नये. अभ्यासासंदर्भात स्वतःचे आत्मपरीक्षण करून सराव वाढवावा तरच यश मिळेल असे सांगितले.
या सभेसाठी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे शास्त्र शाखेचे अध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.दिलीप मस्के यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.आरती वेदपाठक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विजय सासणे यांनी केले.