राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांची निवड झाल्याबद्दल जवळा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार संपन्न.

जवळा (प्रशांत चव्हाण) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या संभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यात सिंहाचा वाटा असलेले मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याबद्दल जवळा ग्रामपंचायतच्या वतीने कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा येथे त्यांचा सत्कार जवळा गावचे तंटामुक्त अध्यक्ष मा.अरुण भाऊ घुले-सरकार व सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच नवाज खलिफा,विठ्ठल गयाळी,विजयकुमार तारळकर,निसार शेख,मीना सुतार निलावती मेहेत्रे,ग्रामविकास अधिकारी रसाळ भाऊसाहेब बाबासो इमडे,सुनील आबा साळुंखे,अनिल सुतार,प्रवीण साळुंखे,अनिल साळुंखे गुण्णाप्पा शिवणगी,दादा मडके सखाराम माळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ प्राचार्य,उपमुख्याध्यापक,शिक् षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.