सांगोला महाविद्यालयात “प्रेरणा” भितीपत्रकाचे उद्घाटन

सांगोला महाविद्यालयात गुरुवार दिनांक 12/10/2023 रोजी सांगोला
महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन अंतर्गत “प्रेरणा” व “गॅलेक्सी” या भितीपत्रकाचे
उद्घाटन महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
देण्यासाठी दरवर्षी “प्रेरणा व गॅलेक्सी” भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येते.
या कार्यक्रमातून अनेक साहित्यिक, कवी, चित्रकार, शास्त्रज्ञ इ. निर्माण व्हावेत आणि
यामधून प्रेरणा घ्यावी असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. बबन
गायकवाड, डॉ.रमेश टेंभुर्णे यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. राम पवार विद्यार्थी
प्रतिनिधी गुलाब गौस तांबोळी, कु. सानिका टाकळे व कु. साक्षी भोसले यांनी
सहभाग घेतला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रेरणा व गॅलेक्सी कमिटीतील शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.