सांगोला लायन्स क्लबकडून महिला डॉक्टरांचा सन्मान व मोफत नेत्र तपासणी शिबिर
कै. शोभनतारा चं झपके २४ व्या स्मृतीदिनानिमित्त दिनानिमित्त आयोजन

सांगोला (प्रतिनिधी) -समाजाला प्रेम आणि विश्वास देवून माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुध्दचंद्र झपके सर यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला समाजाच्या अभ्युदयासाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व इतर क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. लायन्स क्लब नेहमी समाजाच्या उन्नतीसाठी व समाजासाठी कार्य करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करीत असते. हा विचार प्रमाण मानून सांगोला नगरपरिषद पहिल्या महिला नगराध्यक्षा व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला माजी अध्यक्षा कै शोभनतारा उर्फ बाईसाहेब चं झपके यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त लायन्स क्लब सांगोला कडून ‘सन्मान कर्तृत्वाचा गौरव महिला डॉक्टरांचा’ अंतर्गत सांगोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सांगोला शहरातील महिला डॉक्टरांचा सन्मान झोन चेअरमन ला.राजीव कटेकर ( ३२३४ ड१ झोन २ )यांचे शुभहस्ते व माजी प्रांतपाल ३२३४ड १ ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तसेच लायन्स क्लब ऑफ सांगोला व श्रीमंत विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,सांगोला येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर विद्यामंदिर परिवार सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व सांगोला शहर व परिसरातील गरजू लोकांसाठी आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व ज्यांना मोतीबिंदू आहे. अशा रुग्णांचे अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी लायन्स आय हॉस्पिटल सांगली स्वतःच्या रुग्णवाहिकेतून घेऊन जाणार आहे व परत सोडणार आहे.तरी सांगोला शहर व परिसरातील गरजूंनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला. प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला. उन्मेष आटपाडीकर, खजिनदार ला. प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले आहे.