नंदेश्वरच्या कोतवालपदी अमीर शेख यांची निवड

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर सजा येथे इतर मागास वर्गासाठी कोतवाल या पदाचे आरक्षण पडलेले होते.नंदेश्वर सजासाठी कोतवाल या पदासाठी आठ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते; त्यापैकी छाननीमध्ये तीन जणांचे अर्ज पात्र झाले होते तर उर्वरित पाच जणांचे अर्ज अपात्र झाले होते.पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथे घेण्यात आली होती व दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता निवड यादी तहसील कार्यालय मंगळवेढा येथे प्रसिद्ध करण्यात आली.यामध्ये नंदेश्वर सजासाठी अमीर गफार शेख यांची निवड प्रसिद्ध करण्यात आली.
निवडीनंतर त्यांचे श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, सरपंच सजाबाई गरंडे,उपसरपंच आनंदा पाटील,तलाठी बालासाब शेख,श्री बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर,देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,पोलीस पाटील संजय गरंडे यांच्यासह युवक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले.