मोफत नेत्र तपासणी शिबिरात ३० महिलांची नेत्र तपासणी

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान, डॉ. वाघमोडे यांचे चंद्रभागा नेत्रालय व श्री अक्कमहादेवी वीरशैव महिला संघटना, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३० महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. तानाजी वाघमोडे, डॉ स्वाती बारणे, ऑप्थोमेट्रिसिट प्रदीप पवार, अनिकेत मनकापुरे, शितल घुले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेशकाका चौगुले, अरविंद केदार, गोविंददादा माळी, अण्णासाहेब मदने, प्रसन्न कदम, इंजि. विकास देशपांडे, डॉ. अनिल कांबळे, राजेंद्र दिवटे, रमेश देवकर, वसंत सुपेकर, अमर कुलकर्णी, दादा खडतरे, संजय सरगर, प्रथमेश यादव, यांच्यासह श्री अक्कमहादेवी महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. सारिका संजय लोखंडे, सविता नागेश लोखंडे, उज्वला संजय कोठावळे, कांचन प्रकाश होनराव, अनुराधा शशिकांत स्वामी, सुनिता कैलास ढोले, योजना मनोज ढोले, संगिता राजकुमार ढोले, सुरेखा राजकुमार घोंगडे, चिमाताई बळवंत इंगवले, प्रिती उत्तम ढोले, अनुपमा प्रशांत गुळमिरे, शोभा गोंविंद माळी आदी उपस्थित होत्या .