उद्योगपती जे.एम.म्हात्रे यांची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक १९ आक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजता प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर सकाळी ठिक दहा वाजता बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विणापुजन करण्यात आले,त्यानंतर ठिक अकरा वाजता प्रवचनसेवा झाली.
यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी माऊली मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी देवसागर साधक ट्रस्ट व देवसागर साधक समाजाच्या वतीने त्यांचा हार,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड,आबा नवार यांच्यासह नारळवाडी येथील समस्त गुरु बंधू-भगिनी व माऊली भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.