महाराष्ट्र

एन.एम. एम. एस. परीक्षेत नाझरा विद्यामंदिर चे 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र*

*एन.एम. एम. एस. परीक्षेत नाझरा विद्यामंदिर चे 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र*

नाझरा(वार्ताहर):- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील 11 विद्यार्थ्यांनी एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक म्हणून पात्र ठरले असून सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे.

डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे पुढील चार वर्षे प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत,तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना दरवर्षी 9600 प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहेत.

एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे बाबर आदर्श संजीव 132 गुण जिल्ह्यात 23 वा, पाटील अस्मिता रावसाहेब 128 गुण जिल्ह्यात 38 वा, बाबर सुशांत राजाराम 125 गुण जिल्ह्यात 51 वा, खळगे गौरी बाळासाहेब 124 गुण जिल्ह्यात 58 वा,आडसूळ मानसी संतोष 115 गुण जिल्ह्यात 130 वा, राऊत विराज विजय 113 गुण जिल्ह्यात 146 वा, आदट राजवीर सुहास गुण 105 इतर मागासवर्गीयातून 15 वा, देशपांडे सोहम महेश गुण 104 इ डब्ल्यू एस संवर्गातून जिल्ह्यात 45 वा,वलेकर रोहित बंडू गुण 104 एनटीसी संवर्गातून जिल्ह्यात तिसरा,गोडसे ओम श्रीमंत गुण 96 इतर मागासवर्गीयातून जिल्ह्यात 75 वा, वाघमारे वेदांत राजाराम गुण 95 शेड्युल्ड कास्ट मधून जिल्ह्यात 18 वा तर छत्रपती राजश्री शाहू महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे- बाबर वैष्णवी संजय, बाबर श्रेयसी सुभाष,बाबर सिया अंकुश, मिसाळ अमोल राजेंद्र, वराडे प्रथमेश प्रतापसिंह, यादव सुरज बाळासाहेब यांनी यश मिळवले आहे.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना पेढा वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा विभाग प्रमुख वसंत गोडसे, एन.एम. एम.एस. परीक्षा विभाग प्रमुख मारुती सरगर,सोमनाथ सपाटे, संजय चौधरी, महालिंग पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, डी.डी.जगताप, प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह शिक्षकांनी व परिसरातील पालकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button