सांगोला विद्यामंदिरमध्ये ‘डीपर’चे हरीश बुटले यांचे मार्गदर्शन

सांगोला ( प्रतिनिधी) विद्यार्थ्यांची विज्ञानातील आणि गणितातील रुची वाढावी, पाया भक्कम व्हावा, विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या विभागात सहज प्रवेश मिळावता यावा, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांचे क्षमतासंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘डीपर’ संस्थेकडून सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी व बारावी शास्त्र विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या सीईटी व नीट परीक्षेच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या डीपर परीक्षेसंदर्भात हरीश बुटले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषण माने,प्रा.विलास येलपले,प्रा.अमोल मिरगने,प्रा.देवेन लवटे, सांगोला विद्यामंदिर सीईटी प्रमुख प्रा.जालिंदर मिसाळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना हरीश बुटले म्हणाले नॉन झिरो मार्क्स असताना इंजिनिअर होऊ शकतो परंतु तसे इंजिनिअर होण्यास आत्मसन्मान नाही कारण चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून आपण इंजिनिअर झालो तर आपल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी सर्वोच्च परीक्षा म्हणून त्याच पातळीवरती जाऊन प्रश्नपत्रिका व परीक्षांचे नियोजन केले जाते.सलग २७ वर्ष नियमितपणे ‘डीपर’ ही विश्वासार्ह संस्था याचे नियोजन करते. या संस्थेकडून काही वेळेस शासन देखील मार्गदर्शन घेते तसेच इयत्ता पाचवी व आठवी साठी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी म्हणून डीपर कडून महाएक्झाम परीक्षा घेतली जाते.
या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जालिंदर मिसाळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अश्विनी जालगिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.उल्हास यादव यांनी केले.