मेडशिंगी विद्यालयाचा राहुल गोडसे याची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड

१५ ऑक्टोबर २०२३ रोजी गुंडावली मुंबई पब्लिक स्कुल,अंधेरी(मुंबई) येथे राष्ट्रीय कराटे महासंघ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व क.महाविद्यालय,मेडशिंगी प्रशलेचा विद्यार्थी राहुल विष्णू गोडसे याने कांस्य पदक मिळवत पुढील दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याला क्रीडाशिक्षक बी.एन.गवळी सर,एच.बी.घाडगे,एम.एस.नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राहुलने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी,प्रशालेचे प्राचार्य अजित घोंगडे,पर्यवेक्षक सूर्यकांत कसबे, मार्गदर्शक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी,पालक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी राहुलचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.