राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये पेटवडगाव आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज यांनी पटकावला प्रथम क्रमांक

सांगोला (उत्तम चौगुले) :-नुकत्याच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पेटवडगाव आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज यांनी नागपूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे .या विद्यालयातील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला त्या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना बीड विरुद्ध कोल्हापूर झाला असता 8-0 या धाव संख्येने मात करून विद्यालयाच्या संघाने दणदणीत विजय मिळवला.
या सर्वच खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे माजी सैनिक कल्याणकारी संस्था परिवाराकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले .या स्पर्धेमध्ये सांगोला तालुका मधील मेजर रेवनसिद्ध हरिश्चंद्र पाटील यांचा चिरंजीव रितेश रेवन सिद्ध पाटील भाग घेऊन वाणिचिंचाळे गावचे व सांगोला तालुक्याचे नाव पुऱ्या महाराष्ट्रात गाजवले.