जाधव वाडी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

महूद/प्रतिनिधी
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये व रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे.त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत आहे.या अनुषंगाने चिकमहूद (ता.सांगोला) येथील जय अंबिका तरुण मंडळ जाधववाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करणे हा प्रेरणादायी उपक्रम गेली अनेक वर्षे जय अंबिका तरुण मंडळ,जाधववाडी यांचे वतीने सलगपणे सुरू आहे.
जय अंबिका तरुण मंडळ जाधववाडी या मंडळाच्या वतीने अशाच प्रकारे विविध समाज उपयोगी कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरे केले जातात.त्यांच्या या रक्तदान शिबिरास चिकमहुद,जाधववाडी परिसरातील नागरिकांकडून उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.या शिबिरामध्ये परिसरातील अनेक युवकांनी व रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली.यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ,तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांगोला येथील रेवनील रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात शेकडो रक्तादात्यांनी रक्तदान केले.