अचकदाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय भारत मोरे यांची बिनविरोध निवड

महूद/प्रतिनिधी
अचकदाणी (ता.सांगोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अचकदाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय भारत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी
सौ.सारिका वामन हगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर दत्तात्रय मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंकज सावंत,सौ.मिनाज मुलाणी,सौ.मिनाक्षी चव्हाण,सौ.अंजली सरतापे,सौ.तेजस्विनी चव्हाण,शहाजी पाटील ,खुशबू मुलाणी,संतोष कांबळे, वैष्णवी पाटील श्रावणी काटे,रविंद्र पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.