महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पाचवी ची शिष्यवृत्ती शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॅालेज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची इयत्ता पाचवी ची शिक्षक पालक सभा शनिवार दि. १९ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली. या शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक दशरथ जाधव तर मार्गदर्शक म्हणून संस्था संचालक प्रा.डॅा. अशोकराव शिंदे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रा.केशव माने, संस्था सदस्य प्रा.दिपकराव खटकाळे,प्रा.जालिंदर टकले यांच्यासह सर्व पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ.कविता शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक-पालक-समाज या त्रिकूटाची महत्वाची भूमिका उपस्थितांना सांगितली. यानंतर निलोफर मुजावर यांनी स्पर्धा परिक्षेबाबत पालकांनी माहिती दिली.

यावेळी पालकांमधून बाळासो बनकर, कांतीलाल राऊत,शशिकांत कोळी,कबीर किर्तके,सुनिल केंगार,दादासो शिरगिरे,श्रावणी राऊत,फरहद खाटीक यांनी आपल्या सूचना सांगितल्या. शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रा.केशव माने यांनी पालकांकडून आलेल्या सर्व सूचनांचे स्वागत केले व त्या सर्व सूचनांचे अंमलबजावणी करण्याचे कबूल केले.

शिक्षक पालक सभेचे अध्यक्ष दशरथ जाधव म्हणाले की,विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवुन विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांनी पाल्याचा शारिरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास सशक्त होण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक आणि पालकांच्या विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे,जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक बदल करून शैक्षणिक प्रगती साधता येईल, असे सांगितले.

यावेळी प्रा.डॅा.अशोकराव शिंदे प्रा.जालिंदर टकले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर,तर आभार अविनाश सरगर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button