सांगोला महाविद्यालय येथे पार पडलेल्या टी.सी.एस. कंपनीच्या कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये 91 विद्यार्थ्यांची निवड

सांगोला/प्रतिनिधी: दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पुणे या नामांकित कंपनीची कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रिया पार पडली. सदर कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रियेतून ९१ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. यावेळी संगणक विभागप्रमुख डॉ. राजकुमार ताठे, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
सदर निवड प्रक्रियेसाठी सोलापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी टी.सी.एस. कंपनीच्या एच.आर पल्लवी बरुआ मॅडम एच.आर टीम मधील चार सहकारी व टेक्निकल टीम मधील 16 सहकारी उपस्थित होते. सदर कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रियेची सुरुवात ही लेखी परीक्षेपासून झाली. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टेकनिकल व एच.आर. मुलाखती झाल्या ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यातून 91 विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती टी.सी.एस. कंपनीकडून महाविद्यालया घेण्यात आल्या. मुलाखतीतून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. श्री बाबुरावजी गायकवाड, उपाध्यक्ष श्री. ता.ना. केदार, प्रा. पी.सी.झपके, संस्था सचिव म.सि.झिरपे सर व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. सदर भरती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.