उजनी धरणातून पिण्यासाठी४.५ टी. एम. सी.पाणी सोडण्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांची मान्यता

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्यच्या पाठपुराव्याने अखेर पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश.
पाऊस लांबणीवर गेला असल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे सांगोला शहर तालुक्यासह पंढरपूर शहर व सोलापूर शहर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना या उजनी धरणावर अवलंबून आहेत धरण क्षेत्रावर पाऊस कमी पडल्यामुळे या योजनांसाठी अपुरा पाणीपुरवठा होत होता परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली होती गुरुवार दिनांक १४ रोजी खासदार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर व शहाजीबापू पाटील यांनी सांगोला पंचायत समिती येथे टंचाई आढावा बैठक घेत संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला होता
यामध्ये प्रामुख्याने सांगोला शहरातील पाणीपुरवठा संदर्भात चर्चा झाली होती त्या अनुषंगाने आमदार शहाजी बापू पाटील यांनी तात्काळ सांगोला तालुक्यातील व शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे जिल्हाधिकारी सोलापूर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कळवले होते व सातत्याने पाठपुरावा करून यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दुपारी पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
काल सोडलेल्या उजनी धरणातुन ४.५टी. एम. सी. पाण्यातून सांगोला शहर, सांगोला तालुक्यातील शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पंढरपूर शहर सोलापूर शहर यांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार आहे.